Exodus 1:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मिसरवासीयांनी इस्राएल लोकावंर अधिक कठीण व कष्टाची कामे लादली; परंतु जसजसे ते त्यांच्यावर अधिक कष्टाची कामे लादू लागले तसतसे इस्राएल लोक अधिकच संख्येने वाढत गेले व अधिकच पसरले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले, तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्राएलवंशजांचा तिटकारा वाटू लागला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मिसऱ्यांनी त्यांना जसजसे जाचले तसतसे ते संख्येने अधिकच वाढत गेले व अधिकच पसरले, म्हणून इस्राएल लोकांची त्यांना भीती वाटू लागली.