Exodus 1:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशा प्रकारे मिसरवासीयांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केलें; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, घाण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीन व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना मातीचा गारा व विटा करायला आणि शेतात हरतर्हेची कामे करायला लावत. असल्या बिकट कामाने त्यांना जीव नकोसा झाला; कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
विटा व चुन्यातील कष्टाच्या कामाने त्यांचे जीवन कठीण केले आणि शेतातील प्रत्येक प्रकारच्या कष्टाच्या कामात त्यांच्याशी इजिप्तचे लोक कठोरतेने वागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशाप्रकारे त्यांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केले; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, बांधकामासाठी चुना बनविण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.