Exodus 1:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु इस्राएल लोकांना पुष्कळ मुले झाली आणि त्यांची संख्या वाढत गेली; ते लोक महाप्रबल झाले आणि सर्व मिसर देश त्यांनी भरून गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलवंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पावून बहुगुणित झाले; ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु इस्राएली लोक अत्यंत फलद्रूप झाले; ते बहुगुणित होऊन त्यांना पुष्कळ संतती झाली आणि त्यांची संख्या वाढून, लवकरच ते इतके असंख्य झाले की संपूर्ण देश त्यांनी व्यापून टाकला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएल लोक फार फलदायी होऊन त्यांची संख्या अतिशय वाढत गेली; ते महाशक्तीशाली झाले आणि सर्व देश त्यांनी भरून गेला.