Exodus 10:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे व त्याच्यसेवकांची मने मी कठीण केली आहेत. मी हे यासाठी केले आहे की मला त्यांना माझ्या चमत्कारांचे सामर्थ्य दाखवावयाचे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या सेवकांचे मन कठीण केले आहे ते ह्यासाठी की, त्यांच्यामध्ये मी ही आपली चिन्हे प्रकट करावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या अधिकार्‍यांची मने कठीण केली आहेत, अशासाठी की मी त्यांच्यामध्ये माझे चमत्कार करावे
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे मन व त्याच्या सेवकांची मने मीच कठीण केली आहेत. माझ्या सामर्थ्याची चिन्हे त्यांच्यामध्ये दाखवावी म्हणून मी हे केले.