Exodus 10:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. आणि हीच तर तुम्ही मला विंनती केली होती. तेव्हा तुम्हा सर्वाना मी जाऊ देणार नाही.” त्यानंतर फारोने मोशे व अहरोन यांना घालवून दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे होणार नाही; तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा; कारण तुम्ही तरी हेच मागत आहात.” मग त्यांना फारोपुढून घालवून दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाही! याहवेहची उपासना करण्यासाठी फक्त पुरुषांनीच जावे, कारण तशीच मागणी तुम्ही करत होता.” मग मोशे व अहरोनास फारोहच्या पुढून हाकलून देण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नाही! फक्त तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. कारण तेच तर तुम्हास पाहिजे आहे.” त्यानंतर त्यांना फारोपुढून घालवून दिले.