Exodus 10:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते टोळ तुझा वाडा, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, वाडे या सर्वात भरून जातील. तुझ्या वाडवडीलांनी आज पर्यंत पाहिले असतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील. मिसरमध्ये लोकवस्ती होऊ लागली त्या काळापासून आता पर्यंत कधीही नव्हते, तेवढे अधिक ते टोळ असतील.”‘ नंतर फारो समोरून मोशे निघून गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी घरे, तुझ्या सर्व सेवकांची घरे आणि सर्व मिसरी लोकांची घरे ते व्यापून टाकतील, इतके टोळ तुझ्या बापदादांनी किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या जन्मात आणि आजवरदेखील पाहिले नसतील.”’ मग मोशे मागे फिरून फारोपुढून निघून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तुझी घरे व तुझ्या अधिकार्यांची व सर्व इजिप्तच्या लोकांची घरे भरून टाकतील; इजिप्तच्या इतिहासात तुझे वडील व तुझे पूर्वज या देशाचे रहिवासी झाले तेव्हापासून आजपर्यंत असे झालेले त्यांनी कधी पाहिले नाही.’ ” मग मोशे वळून फारोहपासून निघून गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते टोळ तुझी घरे, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, व्यापून टाकतील. तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत पाहिले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील.” नंतर मोशे फारोसमोरून निघून गेला.