Exodus 10:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा फारोने मोशे व अहरोन यांना पुन्हा बोलावून आणण्यास आपल्या काही सेवाकांना सांगितले. फारो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु नक्की कोण कोण जाणार आहे ते मला सांगा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मोशे आणि अहरोन ह्यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आले आणि तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करा; पण कोणकोण जाणार?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मोशे व अहरोन यांना फारोहकडे पुन्हा बोलाविण्यात आले. फारोह त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचा परमेश्वर याची उपासना करावी म्हणून तुम्ही जा, पण कोण कोण जाणार हे मला सांग.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे व अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणले, तो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु कोण कोण जाणार आहेत?”