Exodus 11:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसर देशावर आणखी एक पीडा आणणार आहे. ह्या पीडेनंतर मात्र फारो तुम्हाला मिसरमधून जाऊ देईल; खरे म्हणजे तो तुम्हाला मिसर देशातून बाहेर घालवून देईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी फारोवर आणि मिसर देशावर आणखी एक पीडा आणीन, त्यानंतर तो तुम्हांला येथून जाऊ देईल; आणि तो जाऊ देताना तुम्हांला येथून कायमचे घालवून देईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याहवेह मोशेला म्हणाले, “मी फारोह व इजिप्तवर आणखी एक पीडा आणेन. त्यानंतर तो तुम्हाला या ठिकाणाहून जाऊ देईल आणि जेव्हा तो हे करेल तेव्हा तो तुम्हाला अक्षरशः देशातून घालवून देईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हास येथून जाऊ देईल; तो तुम्हास जाऊ देईल तेव्हा तो तुम्हास सर्वस्वी ढकलून काढून लावील,