Exodus 12:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग एजोब झाडाच्या पानांच्या जुड्या घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळाव्या आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळ पट्ट्यांवर लावावे. आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर एजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एजोबाची जुडी घेऊन ती पात्रात घेतलेल्या रक्तात बुडवा व त्याने ते रक्त घराच्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर लावा. तुम्हापैकी कोणीही सकाळ होईपर्यंत आपल्या घराबाहेर पडू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग एजोब झाडाची जुडी घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळावी आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळपट्टीवर लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये.