Exodus 12:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण त्यावेळी परमेश्वर मिसरमधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळ पट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो त्या घराचे संरक्षण करील; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात प्रवेश करु देणार नाही, व तुम्हाला काही अपाय होऊ देणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण परमेश्वर मिसर्‍यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे; ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहील ते ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणार्‍याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण याहवेह या देशात संचार करतील व इजिप्तवासियांचा संहार करतील. पण ज्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर रक्त दिसेल, याहवेह त्या घराला ओलांडून पुढे जातील व विनाशकाला तुम्हाला मारण्यास तुमच्या घरात येऊ देणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण त्या वेळी परमेश्वर मिसरामधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळपट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो ते दार ओलांडून जाईल; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात जाऊ देणार नाही.