Exodus 12:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, ‘हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांना मारले परंतु इस्राएल लोक राहात असलेली घरे ओलाडूंन तो पुढे गेला व त्या घरातील आम्हा सर्वाना त्याने वाचवले’ त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन त्याची उपासना केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तुम्ही सांगा की, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; त्याने मिसरी लोकांना मारले व आमच्या घरांचा बचाव केला त्या समयी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला.” हे ऐकून लोकांनी मस्तके लववून दंडवत घातले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्यांना सांगा, ‘हा याहवेहसाठी वल्हांडणाचा यज्ञ आहे, ज्यांनी इजिप्तच्या लोकांचा संहार करून त्यांचा नाश केला, आणि इस्राएली लोकांची घरे ओलांडून गेले आणि आम्हाला वाचविले.’ ” तेव्हा लोकांनी आपली मस्तके नमवून त्यांना नमन केले व त्यांची आराधना केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा त्या दिवशी परमेश्वराने मिसराच्या लोकांस मारले व आपल्या घरांना वाचवले त्या वेळी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला, हे ऐकून लोकांनी नतमस्तक होऊन दंडवत घातले.