Exodus 12:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही आज्ञा इस्राएलच्या सर्व जनसमूहासाठी आहे; ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक माणसाने आपल्या कुटुंबातील माणसाकरिता एक कोकरा घ्यावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांगा की, ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एकेका घराण्यामागे एकेक कोकरू घ्यावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू इस्राएलाच्या सर्व समुदायाला जाहीर कर की, या महिन्याच्या दहाव्या दिवशी, प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी एक कोकरू घ्यावे, प्रत्येक घराण्यासाठी एक कोकरू.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक मनुष्याने आपल्या कुटुंबातील लोकांकरता एक कोकरू घ्यावे.