Exodus 13:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
फारोने इस्राएल लोकांना मिसर सोडून जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांना पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही; कारण परमेश्वर म्हणाला, “त्यांना त्यातून जाताना लढावे लागेल आणि मग त्यामुळे आपल्या मनातले विचार बदलून ते लोक माघारे वळून मिसर देशाला परत जातील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फारोने लोकांना जाऊ दिले तेव्हा पलिष्टी लोकांच्या देशाची वाट जवळची असूनही देवाने त्यांना त्या वाटेने जाऊ दिले नाही, कारण लढाई दिसताच लोक माघार घेऊन मिसराकडे परत जातील असे देवाला वाटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेवटी फारोहने जेव्हा लोकांस जाऊ दिले, तेव्हा परमेश्वराने त्यांना पलिष्ट्यांच्या देशातून जवळचा मार्ग असूनही तिथून चालविले नाही. कारण परमेश्वर म्हणाले, “जर युद्धाला सामोरे जावे लागले तर त्यांचे मन बदलेल व ते पुन्हा इजिप्तकडे जातील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फारोने लोकांस जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांस पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही “युध्द प्रसंग पाहून हे लोक माघार घेऊन मिसर देशाला परत जातील, असे देवाला वाटले.”