Exodus 13:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी विशेष करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी या लोकांचा देश मी तुम्हाला देईन; त्यामुळे त्या देशात नेल्यानंतर तुम्ही या दिवसाची आठवण ठेवलीच पाहिजे; तुम्ही प्रत्येक वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या ह्या दिवशी परमेश्वराची उपासना करण्यासाठी हा सण पाळला पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबूसी ह्यांच्या देशात, म्हणजे जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा जो देश तुला देण्यास परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली त्या देशात तुला आणल्यावर ह्या महिन्यात तू हा सण पाळावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तुम्हाला कनानी, हिथी, अमोरी, यबूसी आणि हिव्वी यांचा देश, ज्यात दूध व मध वाहतो, ते तुम्हाला देतील अशी तुमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली, त्यात याहवेह तुम्हाला नेतील; तेव्हा या महिन्यात हा विधी तुम्ही पाळावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी ह्याच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या देशात आणल्यानंतर तुम्ही या महिन्यात ही सेवा करावी.