Exodus 14:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोक निसटून गेल्याचे फारोला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांना आपल्या हातून पळून का जाऊ दिले? आता आपण आपल्या गुलामांना मुकलो आहोत!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोक पळून गेले आहेत हे वर्तमान मिसराच्या राजाला कळले तेव्हा फारोचे व त्याच्या सेवकांचे मन त्या लोकांसंबंधाने बदलले, आणि ते म्हणू लागले की, “इस्राएल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊ दिले हे आम्ही काय केले?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा इजिप्तच्या राजाला सांगितले गेले की ते लोक पळून गेले, फारोहने व त्याच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याविषयी आपले मन बदलले व ते म्हणाले, “आपण हे काय केले? आपण इस्राएली लोकांना जाऊ दिले व त्यांची सेवा गमावली!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएल लोक निसटून गेल्याचे मिसराच्या राजाला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांस आपल्या दास्यातून पळून का जाऊ दिले?”