Exodus 15:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
फारोचे घोडे, घोडेस्वार व रथ समुद्रात गेले आणि परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फारोचे घोडे, रथ व स्वार समुद्रात गेले आणि परमेश्वराने समुद्राचे पाणी त्यांच्यावरून वाहवले, पण इस्राएल लोक भरसमुद्रामध्ये कोरड्या जमिनीवरून चालत गेले, (म्हणून त्यांनी वरील गीत गाइले).
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा फारोहचे घोडे, रथ आणि घोडेस्वार समुद्रामध्ये गेले, तेव्हा याहवेहने समुद्राचे पाणी परत त्यांच्यावर आणले; परंतु इस्राएली लोक समुद्रामधून कोरड्या वाटेवरून चालले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फारोचे घोडे, स्वार व रथ समुद्रात गेले, या प्रकारे परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.