Exodus 16:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग इस्राएल लोक प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाले व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीनायच्या रानात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग एलीम येथून कूच करून इस्राएल लोकांचा सर्व समुदाय मिसर देशातून निघाल्यावर दुसर्‍या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम आणि सीनाय ह्यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहचला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इजिप्त देशातून बाहेर आल्यावर, दुसर्‍या महिन्याच्या पंधराव्या दिवशी इस्राएलचा समुदाय एलीम येथून निघून एलीम व सीनायच्या मध्ये जे सीन रान आहे त्याकडे आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग इस्राएली लोकांची मंडळी प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाली व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीन रानात येऊन पोहचले.