Exodus 16:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोशेने त्यांना सांगितले, “हे असे होईल असे परमेश्वराने सांगितले होते; हे असे झाले कारण उद्या शब्बाथ दिवस आज तुम्हाला लागणारे सर्व अन्न शिजवून तयार ठेवावे परंतु उरलेले दुसऱ्या दिवशी सकाळसाठी ठेवावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विसाव्याचा दिवस, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे; तुम्हांला भाजायचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा. जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशेने त्यांना सांगितले, “याहवेहची आज्ञा हीच आहे: ‘उद्या विसाव्याचा दिवस, याहवेहचा पवित्र शब्बाथ आहे. तर तुम्हाला जे काही शिजवायचे आहे ते शिजवा व जे उकळावयाचे असेल ते उकळून घ्या. जे उरेल ते सकाळपर्यंत ठेवा.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विश्रामवार, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे. तुम्हास भाजावयाचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवावे.”
Recommended Reading