Exodus 16:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाहा तुम्ही विसावा घ्यावा यासाठी परमेश्वराने शब्बाथ दिवस बनविला आहे; म्हणून शुक्रवारी परमेश्वर तुम्हाला दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा शब्बाथ दिवशी तुम्ही आहात तेथे बसून विसावा घ्यावा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, परमेश्वराने तुम्हांला शब्बाथ दिला आहे म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हांला दोन दिवसांचे अन्न देतो. सातव्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले ठिकाण सोडून कोणीही बाहेर जाऊ नये.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे लक्षात घ्या की याहवेहने तुम्हाला हा शब्बाथ दिलेला आहे; म्हणून सहाव्या दिवशी ते तुम्हाला दोन दिवसासाठी भाकर देतात. सातव्या दिवशी प्रत्येकाने ते जिथे आहेत तिथेच थांबावे; कोणीही बाहेर जाऊ नये.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा परमेश्वराने तुम्हास शब्बाथ दिला आहे; म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हास तो दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा सातव्या दिवशी आपआपल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले स्थान सोडून कोणीही बाहेर जाऊ नये.”