Exodus 16:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोशे म्हणाला, “परमेश्वराने सांगितले, ‘या अन्नातील आठवाट्या म्हणजे एक ओमर इतके किंवा एका एफाचा दहावा भाग इतके अन्न तुमच्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेवा म्हणजे मग तुम्हाला मिसर देशातून काढून नेल्यावर मी तुम्हाला रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की, ह्यातले एक ओमरभर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी ठेवा; मी तुम्हांला मिसर देशातून काढून आणून रानात कोणत्या प्रकारचे अन्न दिले हे त्यांना ह्यावरून दिसेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे म्हणाला, “याहवेहने अशी आज्ञा दिली आहे: ‘एक ओमेर मान्ना घेऊन तो येणार्या पिढ्यांसाठी ठेवा, की तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणल्यावर रानामध्ये मी तुम्हाला खायला दिलेली भाकरी ते पाहू शकतील.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की ह्यातले एक ओमर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी राखून ठेवा. मी तुम्हास मिसर देशातून काढून नेल्यावर रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.”