Exodus 17:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
होरेब डोंगरावरील एका खडकावर म्हणजे सिनाय डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन, त्या खडकावर ती आपट म्हणजे त्या खडकातून पाणी बाहेर येईल. मग लोकांनी ते प्यावे.” मोशेने हे सर्व केले आणि इस्राएल लोकांच्या वडिलधाऱ्या माणसांनी म्हणजे पुढाऱ्यांनी ते पाहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन; आणि तू त्या खडकावर काठी आपट म्हणजे त्यातून पाणी निघेल आणि लोक ते पितील.” इस्राएलाच्या वडिलांच्या देखत मोशेने तसे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होरेबातील खडकाकडे मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्या खडकाला काठीने मार आणि त्यातून लोकांना प्यावयास पाणी येईल.” मग मोशेने इस्राएलाच्या वडिलांदेखत तसे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन, त्या खडकावर ती काठी आपट, त्यातून पाणी निघेल. म्हणजे ते हे लोक पितील,” मोशेने हे सर्व इस्राएलांच्या वडिलासमोर केले.