Exodus 18:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरिता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु साध्या प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करावा; त्यांनी सर्व मोठी प्रकरणे तुझ्याकडे आणावीत आणि लहानसहान प्रकरणांचा त्यांनीच निकाल करावा. अशाने तुझे काम हलके होईल व ते तुझ्या भाराचे वाटेकरी होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून असावे, परंतु प्रत्येक अवघड वाद तुझ्याकडे आणावा; आणि सोपे वाद त्यांच्या अधिकार्‍यांनी सोडवावेत. त्यामुळे तुझे ओझे हलके होईल, कारण ते तुझ्याबरोबर तुझा भार वाहतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील.