Exodus 18:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला भेटावयास सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्याला नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली. नंतर ते अधिक बोलणे करावयास मोशेच्या तंबूत गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मोशे आपल्या सासर्यास सामोरा गेला आणि त्याने त्याला नमन करून त्याचे चुंबन घेतले; त्यांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारल्यावर ते डेर्यात गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मोशे त्याच्या सासर्याला भेटायला बाहेर आला आणि नमन करून त्याचे चुंबन घेतले. ते एकमेकांना अभिवादन करून तंबूत गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्यास नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारल्यावर ते तंबूत गेले.