Exodus 19:13 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला कोणी हात लावू नये, लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणांनी विंधावे; मग तो जनावर असो किंवा माणूस असो, त्याला जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घनाद होईल तेव्हा लोकांनी पर्वतावर चढावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी किंवा धनुष्यबाणाने मारावे; कोणीही त्यांना स्पर्श करू नये. ते मनुष्य असो वा प्राणी, त्यांना जिवंत राहू देऊ नये. जेव्हा एडक्याच्या शिंगाचा दीर्घ नाद कानी पडेल तेव्हाच त्यांनी पर्वताजवळ यावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणीही त्यास हात लावू नये. हात लावला तर त्यास दगडमार करावी किंवा बाणांनी विंधावे, तो पशू असो किंवा मनुष्य असो, त्यास जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घ आवाज होईल तेव्हा लोकांनी पर्वताजवळ यावे.”