Exodus 19:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तीन दिवसानंतर पर्वतावर विजांचा लखलखाट व गडगडाट झाला; पर्वतावर एक दाट ढग उतरला आणि रणशिंगाचा फार मोठा आवाज झाला. तेव्हा छावणीत राहाणारे सर्व लोक घाबरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला, तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिसर्या दिवसाच्या सकाळी ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या व पर्वतावर दाट ढग जमा झाले आणि तुतारीचा फार मोठा नाद झाला. छावणीतील सर्वजण भीतीने कापू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिसरा दिवस उजडताच मेघगर्जना झाली व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग आले आणि प्रचंड शिंगाचा फार आवाज होऊ लागला. तेव्हा छावणीत राहणारे सर्व लोक थरथर कापू लागले.