Exodus 19:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले; ते म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.” मग मोशे पुन्हा पर्वतावर देवाला भेटावयास गेला आणि लोक त्याच्या आज्ञा पाळतील असे त्याने देवाला सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले, “परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा सर्व लोक एकत्र प्रतिसाद देत म्हणाले, “जे काही याहवेहने सांगितले, ते सर्व आम्ही करू.” मग मोशेने जाऊन लोकांचे म्हणणे याहवेहला कळविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि सर्व लोक मिळून म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेले सर्व आम्ही करू.” मोशेने परमेश्वरास लोकांचे म्हणणे सांगितले.