Exodus 2:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो बाळ मुलगा असल्यामुळे सापडला जाईल व मारला जाईल अशी त्याच्या आईला भीती वाटली. तीन महिन्यानंतर तिने एक लव्हाव्व्याची पेटी तयार केली; ती पाण्यावर तरंगावी म्हणून तिने तिला आतून व बाहेरून डांबर लावले. तिने त्या तान्ह्या बाळाला पेटीत ठेवले; नंतर तिने ती पेटी नदीत उंच लव्हाव्व्यात ठेवली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्यांचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली; त्या पेटार्यात तिने त्या बालकाला घालून नदीकाठच्या लव्हाळ्यांत नेऊन ठेवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण त्यानंतर त्याला ती लपवू शकत नव्हती, तेव्हा तिने त्याच्यासाठी लव्हाळ्याची एक टोपली घेतली, व तिला डांबर आणि चुन्याचा लेप लावला. मग तिने आपल्या बाळाला त्या टोपलीत ठेवले व ती टोपली तिने नाईल नदीच्या काठी लव्हाळ्यात नेऊन ठेवली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे आणखी तिला तो लपवून ठेवता येईना म्हणून तिने एक लव्हाळ्याची पेटी तयार केली; तिला राळ व डांबर लावले. तिने त्या बाळाला पेटीत ठेवून ती पेटी नदीच्या तीरी लव्हाळ्यात नेऊन ठेवली.