Exodus 2:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग आतापर्यत लपून बसलेली ती बाळाची बहीण राजकन्येकडे गेली व म्हणाली, “या बाळाची काळजी घेण्यासाठी मी जाऊन एखादी इब्रीदाई शोधून आणू का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “आपल्याकरता मुलास दूध पाजण्यासाठी इब्री स्त्रियांतून एखादी दाई बोलावू काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेवढ्यात त्या बाळाची बहीण फारोहच्या राजकन्येला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी इब्री दाई मी तुमच्यासाठी शोधून आणू का?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ती बाळाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी मी जाऊन तुझ्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई शोधून आणू का?”