Exodus 21:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर मारलेल्या माणसाला काही दिवस बिछान्यात पडून राहावे लागले तर मारणाऱ्याने त्याला त्याच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल नुकसान भरपाई द्यावी व तो माणूस बरा होईपर्यंत त्याच्यासाठी लागणारा खर्च द्यावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि तो उठून काठी घेऊन हिंडूफिरू लागला तर मारणार्याला सोडून द्यावे; मात्र तो घरी बसल्याबद्दल त्याचे झालेले नुकसान मारणार्याने भरून द्यावे आणि त्याला पूर्ण बरे करवावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जर उठून काठीच्या आधाराने बाहेर चालू शकेल तर ज्याने मारले तो दंडास पात्र नसून निर्दोष असेल; मात्र दोषी व्यक्तीने इजा झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई व तो व्यक्ती बरा होईपर्यंत सर्व खर्च द्यावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर मारणाऱ्याने त्यास त्याच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल नुकसान भरपाई द्यावी व तो मनुष्य बरा होईपर्यंत त्याच्यासाठी लागणारा खर्च द्यावा.