Exodus 21:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु त्या बैलाने पूर्वी काहीजणांना मारले असेल आणि त्याविषयी त्याच्या मालकाला जर सूचना दिली असेल तर मग तो मालक दोषी आहे कारण त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही किंवा गोठ्यात त्याच्या जागी बंद करून ठेवले नाही आणि म्हणून मोकळा ठेवल्यामूळे त्या बैलाने जर कोणाला जिवे मारले तर त्याबद्दल त्याचा मालक दोषी आहे, त्या बैलाला धोंडमार करुन जिवे मारावे व त्याच्या मालकासही जिवे मारावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि त्या बैलाला आधीचीच हुंदडण्याची सवय असेल आणि त्याच्या धन्याला त्याबद्दल सूचना केली असूनही त्याने त्याला आवरले नाही, आणि मग त्या बैलाने कोणा पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकले, तर त्याला दगडमार करावा आणि त्याच्या धन्यालाही जिवे मारावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण बैल मारका आहे याबद्दल त्याच्या मालकाला सूचना देऊनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही व तो एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकतो, तर त्या बैलाला धोंडमार करावी व त्याच्या मालकास सुद्धा जिवे मारावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्या बैलाला हुंदडण्याची सवयच असली आणि त्याविषयी त्याच्या मालकाला सूचना केली असूनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही आणि त्यानंतर कोणा पुरुषाला किंवा स्त्रीला त्याने जिवे मारले तर त्याबद्दल त्याचा मालक दोषी आहे, त्या बैलाला धोंडमार करून जिवे मारावे व त्याच्या मालकालाही जिवे मारावे.