Exodus 21:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एखाद्या बैलाने जर गुलामाला हुंदडून ठार मारले तर त्या बैलाच्या मालकाने त्या गुलामाच्या मालकाला चांदीची तीस नाणी द्यावी आणि त्या बैलालाही दगडाने जिवे मारावे; गुलाम किंवा गुलाम स्त्री म्हणजे गुलाम पुरुष किंवा स्त्री यांना हा नियम सारखाच लागू राहील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जर बैलाने कोणाच्या दासाला किंवा दासीला हुंदडून मारले, तर त्याच्या धन्याने त्यांच्या धन्याला तीस शेकेल रुपे द्यावे आणि त्या बैलाला दगडमार करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण बैलाने जर एखाद्या स्त्री किंवा पुरुष गुलामाला हुंदडून मारले, तर त्या गुलामाच्या मालकाला बैलाच्या मालकाने तीस चांदीची नाणी द्यावीत व बैलाला धोंडमार करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखाद्या बैलाने जर कोणाच्या पुरुष दासास किंवा स्त्री दासीला हुंदडून ठार मारले तर त्या बैलाच्या मालकाने त्याच्या मालकाला चांदीची तीस शेकेल नाणी द्यावी आणि त्या बैलालाही दगडमार करावी;