Exodus 21:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु त्या बैलाने पूर्वी इतर बैलांना हुंदडून जिवे मारले असेल तर आपल्या मारक्या बैलाला मोकळे सोडल्याबद्दल मालक दोषी ठरेल; त्याने बैलाबद्दल बैल द्यावा व मेलेला बैल घ्यावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण बैलाला आधीचीच हुंदडण्याची सवय आहे हे ठाऊक असूनही धन्याने त्याला आवरले नाही, तर त्याने बैलाबद्दल बैल द्यावा आणि मेलेला बैल त्याचा व्हावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण आपला बैल मारका आहे हे त्या बैलाच्या मालकाला माहिती असूनही, त्याने त्या बैलाला बांधले नाही, तर त्याच्या धन्याने जनावराबद्दल भरपाई करावी व मेलेले जनावर घ्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु तो बैल पूर्वीपासून मारका आहे हे ठाऊक असून मालकाने त्यास बांधून ठेवले नाही, तर त्याने बैलाबद्दल बैल द्यावा व मरण पावलेला बैल त्याचा व्हावा.