Exodus 21:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर मालक तिच्यावर खूष नसेल तर त्याने तिला परत तिच्या बापाला विकावे; जर त्याने तिच्याबरोबर लग्न करावयाचे कबूल केले असेल तर तिला परक्याला विकण्याचा त्याला अधिकार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्या धन्याने तिला आपली बायको करून घेण्याचे ठरवले, आणि पुढे तिच्यावरून त्याची मर्जी उडाली, तर त्याने खंड घेऊन तिला जाऊ द्यावे; त्याने तिला धोका दिल्यामुळे तिला परक्या लोकांना विकून टाकण्याचा त्याला अधिकार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याने तिला आपल्यासाठी निवडून घेतले होते, त्या आपल्या मालकाला जर ती संतुष्ट करीत नाही, तर त्याने तिची खंडणी भरून तिला जाऊ द्यावे; तिला परक्याला विकण्याचा त्याला अधिकार नाही, कारण त्याने तिचा विश्वास तोडला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्या मालकाने तिला आपली पत्नी करून घेण्याचे ठरवले असेल, पण पुढे तिच्यावरून त्याची मर्जी उडाली तर त्याने खंडणी घेऊन तिची मुक्तता करावी. तिला परक्या लोकांस विकण्याचा त्यास अधिकार नाही. तिच्याशी कपटाने वागल्यामुळे तिला विकण्याचा त्यास अधिकार नाही.