Exodus 22:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरले तर त्याला कशी शिक्षा करावी? एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरुन ते कापले किंवा विकून टाकले तर त्याला ते परत देणे शक्य होणार नाही म्हणून त्याने चोरलेल्या एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत; चोरीबद्दल त्याने अशी भरपाई करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एखाद्या मनुष्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले, तर त्याने बैलाबद्दल पाच बैल आणि मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जर एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरले व ते कापले किंवा विकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे परत करावीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.