Exodus 22:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“एखाद्याने आपल्या शेजाऱ्याकडे आपला पैसा किंवा काही चीजवस्तू ठेवण्यासाठी दिल्या आणि जर ते सर्व शेजाऱ्याच्या घरातून चोरीस गेले तर तुम्ही चोर शोधून काढण्याचा प्रयत्न करावा आणि चोर सापडला तर त्याने चोरीस गेलेल्या वस्तूच्या किंमतीच्या दुप्पट किंमत भरून द्यावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी शेजार्याजवळ पैसा किंवा काही माल ठेवायला दिला आणि त्याच्या घरातून तो चोरीस गेला, तर चोर सापडल्यास त्याच्या दुप्पट मोबदला चोराने द्यावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जर कोणी चांदी किंवा सामान सुरक्षित राहावे म्हणून आपल्या शेजार्याकडे ठेवले आणि त्याची चोरी झाली, जर चोराला पकडले तर त्या चोराने त्या सामानाची दुप्पट भरपाई करून द्यावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणी शेजाऱ्याकडे आपला पैसा किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी दिल्या आणि जर ते सर्व त्याच्या घरातून चोरीस गेले, तर चोर सापडल्यावर त्याच्या दुप्पट किंमत चोराने भरून द्यावी.