Exodus 22:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जर हरवलेला एखादा बैल, किंवा एखादे गाढव किंवा मेढरू किंवा वस्त्र यांच्या संबंधी दोन माणसात वाद उत्पन्न झाला व एकजण म्हणाला, ‘हे माझे आहे;’ आणि दुसरा म्हणाला, ‘नाही, ते माझे आहे;’ तर त्या दोघांनी देवासमोर जावे; त्यातून कोण दोषी आहे, हे देव ठरवील; मग दोषी माणसाने दुसऱ्याला त्या वस्तूंच्या किंमतीच्या दुप्पट दाम भरून द्यावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण कोणत्याही प्रकारची आगळीक घडली, मग ती बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र, अथवा कोणतीही गमावलेली वस्तू हिच्यासंबंधीची असो, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली, तर दोघांचे प्रकरण देवासमोर1 यावे व ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजार्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखादे बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र किंवा एखादी हरवलेली वस्तू असे काहीही असो, ज्याबद्दल कोणी कलहाने बेकायदेशीरपणे म्हणतो की, ‘हे माझे आहे,’ तर त्या दोघांचाही वाद न्यायाधीशासमोर आणावा. ज्या कोणाला न्यायाधीश दोषी ठरवेल त्याने दुसर्याला दुपटीने परत करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर हरवलेला एखादा बैल, एखादे गाढव, मेंढरू किंवा वस्त्र यांच्यासंबंधी दोन मनुष्यात वाद उत्पन्न झाला, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली तर त्या हक्क सांगणाऱ्या दोन्ही पक्षांनी देवासमोर यावे; ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजाऱ्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.