Exodus 23:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक ठेवा; सातवे वर्ष हे जमिनीसाठी खास विसाव्या वर्ष ठेवा. त्यावर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतुनाची बने यांच्या बाबतीतही असेच करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण सातव्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील; त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशू खातील. तुझे द्राक्षमळे व जैतुनवने ह्यांविषयीही तसेच कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु सातव्या वर्षी जमीन नांगरू नये आणि न वापरता तशीच पडीक राहू द्यावी. मग तुमच्यातील गरीब लोकांना त्यातील अन्न मिळेल आणि त्यातूनही उरलेले वनपशू खातील. तुमचे द्राक्षमळे व जैतुनाच्या बागांविषयी सुद्धा असेच करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक राहू दे. त्या वर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतूनाची वने यांच्या बाबतीतही असेच करावे.