Exodus 23:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पहिली सुट्टी बेखमीर भाकरीच्या सणाची होय. मी आधी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही हा सण पाळावा; त्यात सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; या सणाच्या वेळी प्रत्येक माणसाने माझ्यासाठी अर्पण आणावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमलेल्या समयी सात दिवस तू बेखमीर भाकरी खा, कारण त्याच महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“बेखमीर भाकरीचा सण पाळावा; मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अवीव महिन्यात नेमलेल्या वेळेत असे करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला. “माझ्यासमोर कोणीही रिकाम्या हाताने येऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्यामध्ये सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.