Exodus 23:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“दुसरी सुट्टी साधारणपणे उन्हाव्व्याच्या सुरवातीस असेल; यावेळी तुम्ही शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा किंवा हंगामाचा सण पाळावा. तिसरी सुट्टी ‘मंडपाचा सणाच्या’ वेळी असेल हा सण वर्षाच्या अखेरीस म्हणजे सुगीच्या दिवसात जेव्हा तुम्ही शेतातील धान्य गोळा करता तेव्हा पाळावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ, आणि वर्षअखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जेव्हा तुम्ही तुमच्या शेतात पेरलेल्या पिकाचा हंगाम करता, तेव्हा त्याच्या प्रथमफळाने हंगामाचा सण पाळावा. “वर्षाच्या शेवटी आपल्या शेतातून तुम्ही हंगाम गोळा करता, तेव्हा संग्रहाचा सण पाळावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा. वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळावा.