Exodus 23:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“सर्वजण एखादी गोष्ट करतात म्हणून तुम्हीही ती खरी मानून करु नका. जर एखादा जनसमूह चुकीची गोष्ट करीत असेल तर तुम्ही त्याच्यांत सामील होउ नका; तुम्हीही चुकीची गोष्ट करावी म्हणून त्यांनी तुमचे मन वळविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे मुळीच ऐकू नका; तुम्ही तर जे योग्य व न्याय्य आहे तेच करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणार्‍या बहुजन-समाजास अनुसरू नकोस आणि बहुजनसमाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय होण्यासाठी साक्ष देऊ नकोस,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“दुष्कृत्य करण्याकरिता जमावाला अनुसरू नका आणि त्या जमावाशी एक होऊन न्यायवादात आपली साक्ष फिरवू नका,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नकोस, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नकोस.