Exodus 27:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“अंगणाच्या फाटकासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा दहा यार्ड (वार) लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीचे विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अंगणाच्या फाटकासाठी एक पडदा बनवावा. तो निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा असून वेलबुट्टीदार असावा. तो वीस हात असून त्याला चार खांब व चार उथळ्या असाव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा, वीस हात लांबीचा पडदा असावा; त्यावर भरतकाम केलेले असावे; त्यात चार खांब व चार बैठका असाव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अंगणाच्या फाटकासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वीस हात लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीदार विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात.