Exodus 28:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोरीव काम करणारा कारागीर ज्याप्रामाणे कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नावर इस्राएलाच्या मुलांची नांवे कोरावी आणि ती सोन्याच्या कोंदणात बसवावीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रत्नांवर कोरीव काम करणार्याच्या कसबाने मुद्रा कोरली जाते त्याप्रमाणे त्या दोन्ही रत्नांवर इस्राएलांच्या मुलांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणांत बसवावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोलवान रत्ने कोरणारे मुद्रेची कोरणी करतात त्याप्रमाणे तू त्या दोन रत्नांवर इस्राएलांच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावी व ती दोन्ही रत्ने सोन्याच्या जाळीदार साच्यात बसवावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रत्नावर कोरीव काम करणारा कारागीर कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नांवर इस्राएलाच्या बारा पुत्रांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसवावीत.