Exodus 28:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“न्यायाचा ऊरपटही तयार करून घ्यावा; कुशल कारागिरांनी जसा एफोद तयार केला, तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा, आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
न्यायाचा ऊरपटही कुशल कारागिराकडून तयार करावा, तो एफोदाप्रमाणे करावा; तो सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा, कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग निर्णय घेण्यासाठी कुशल कारागिरांकडून ऊरपट तयार करून घ्यावा. एफोदाप्रमाणे सोन्याची जर असलेला, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांचे सूत व कातलेल्या रेशमी तागाचा असावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
न्यायाचा ऊरपटही तयार कुशल कारागिराकडून तयार करावा. जसा एफोद तयार केला, तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा, आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा;