Exodus 28:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी ह्यासाठी की ज्या भेटी इस्राएल लोक परमेश्वराला अर्पण करतील त्यात जर काही दोष असेल तर तो त्याने काढावा; त्यामुळे ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील व अर्पिण्यास ती पात्र होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती अहरोनाच्या कपाळावर असावी, ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक पवित्र करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी ते अर्पण करतील, त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; ती नित्य त्याच्या कपाळावर असावी; अशाने ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती पाटी अहरोनाच्या फेट्यासमोर कपाळावर राहील आणि तो इस्राएलांच्या पवित्र भेटीसंबंधीचे दोष वाहील, त्यांच्या कोणत्याही भेटी असो. ती पाटी नित्य अहरोनाच्या कपाळावर असावी, अशासाठी की लोकांच्या भेटी याहवेहला मान्य होतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी. ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक परमेश्वरास पवित्र अर्पण करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; त्यामुळे ती दाने परमेश्वरास मान्य ठरतील.