Exodus 28:43 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि अहरोन व त्याचे मुलगे ज्या ज्या वेळी दर्शनमंडपात पवित्रस्थानापुढे याजक म्हणून सेवा करण्यास जातील त्या त्या वेळी त्यांनी हे चोळणे घातलेच पाहिजेत; तसे न केल्यास, दोषी ठरुन ते मरतील; अहरोनाला व त्याच्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि अहरोन अथवा त्याचे मुलगे दर्शनमंडपात2 प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातील, तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावेत. नाहीतर त्यांना दोष लागून ते मरतील; अहरोनाला व त्याच्या पश्चात त्याच्या वंशाला हा नियम निरंतरचा आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहरोन व त्याचे पुत्र ज्यावेळी सभामंडपात येतील किंवा सेवेसाठी वेदीकडे पवित्रस्थानात जातील, त्यावेळी त्यांनी ती वस्त्रे घालावी, म्हणजे ते दोषी ठरून मरणार नाहीत. “अहरोन व त्याच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि अहरोन व त्याचे पुत्र दर्शनमंडपामध्ये प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यास जातील तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावे; तसे न केल्यास, दोषी ठरून ते मरतील; अहरोनाला व त्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”