Exodus 28:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“एफोद बांधण्यासाठी कारागिरांनी फार काळजीपूर्वक एक पट्टी विणावी; ही एफोदाप्रमाणेच म्हणजे सोन्याची जर, व निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाचे सूत व कातलेल्या तलम सणाच्या कापडाने विणावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी; सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाची ती असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच असावा; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा असावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली एक पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी; सोन्याच्या जरीची, व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची ती असावी.