Exodus 29:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळया व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या आंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूस शिंपडावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो मेंढा वधावा, आणि त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या शेंड्यांना आणि त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या अंगठ्यांना लावावे आणि बाकीचे वेदीवर सभोवती शिंपडावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेंढ्याचा वध करून, त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याच्या पुत्रांच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्यांना, व उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावावे, मग रक्त वेदीच्या सभोवती शिंपडावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळ्यांना व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या अंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूंना शिंपडावे.