Exodus 29:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर वेदीवरील थोडे रक्त घेऊन ते अभिषेकाच्या तेलात मिसळावे, व त्यातले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रावर तसेच मुलांवर व त्यांच्या वस्त्रावरही शिंपडावे; त्यामुळे तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्या बरोबर त्याची मुले व त्यांची वस्त्रे शुद्ध होतील, यावरुन अहरोन व त्याची मुले माझे याजक आहेत व ते विशेष वस्त्रे घालून माझी सेवा करतात हे दिसेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल ह्यांतले थोडे घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रांवर, तसेच त्याच्याबरोबर त्याच्या मुलांवर व त्यांच्या वस्त्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि वेदीवरील काही रक्त व अभिषेकाचे तेल घे व ते अहरोन व त्याच्या वस्त्रांवर व त्याचे पुत्र व त्यांच्या वस्त्रांवर शिंपडावे. मग तो व त्याचे पुत्र आणि त्यांची वस्त्रे पवित्र होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल यांतले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्रावर तसेच त्याच्या पुत्रावर व त्यांच्या वस्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्र आणि त्याच्याबरोबर त्याची मुले व त्यांची वस्रे पवित्र होतील.