Exodus 29:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे यांना अर्पणाचा हा हिस्सा नेहमी द्यावा; ते जेव्हा परमेश्वराला अर्पणे आणतील तेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाच्या हक्काचा म्हणून राहील; आणि इस्राएल लोक जेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाला देतील तेव्हा ते परमेश्वराला दिलेल्या समर्पणासारखे होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या मुलांचा हा निरंतरचा हक्क आहे, कारण हे समर्पित केलेले दान आहे; हे इस्राएलांकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित केलेले दान होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा नेहमीच इस्राएली लोकांकडून अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी शाश्वत हिस्सा असावा. हे इस्राएली लोकांकडून शांत्यर्पणातून याहवेहस दिलेली वर्गणी असावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या पुत्रांचा हा निरंतरचा हक्क आहे. कारण हे समर्पित केलेले दान आहे. हे इस्राएलाकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराकरता समर्पित केलेले दान होय.