Exodus 3:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणाला, “हे तू करु शकशील, कारण मी तुजबरोबर असेन मी तुला पाठवीत आहे याचा पुरावा असा असेल; तू इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणल्यावर या डोंगरावर येऊन माझी उपासना करशील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव म्हणाला, “खचीत मी तुझ्याबरोबर असेन; मी तुला पाठवले ह्याची खूण हीच: तू लोकांना मिसरातून काढून आणल्यावर ह्याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने म्हटले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला पाठविले आहे याचे चिन्ह हेच असणार: जेव्हा तू इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणशील, तेव्हा याच डोंगरावर तुम्ही परमेश्वराची उपासना कराल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने उत्तर दिले, “खचीत, मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला पाठवत आहे याची खूण हीच असेल; तू इस्राएली लोकांस मिसरमधून बाहेर आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल.”